Chakan News : चाकणला टोमॅटोची लाली उतरली

आवक वाढून दरात घसरण

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. मागील आठवड्यात घाऊक बाजारात टोमॅटोचे 60 ते 80 रुपये किलो आणि किरकोळ बाजारात 100 रुपये किलो पर्यंत भिडलेले दर आता घसरले आहेत.

चाकण मार्केट मध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने दारात निम्म्याने घसरण झाल्याचे अडत्यांनी सांगितले. चाकण मार्केट मध्ये टोमॅटोची 215 क्रेट आवक होऊन प्रतिकिलोस दर 35 ते 40 रुपयांवर आले आहेत.

कांद्याचे भाव कोसळले असले तरी टोमॅटोच्या भावात मात्र मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत होती.  वाढती उष्णता, बाजारात यापूर्वी नसलेली मागणी आणि कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड या तीन बाबीचा परिणाम टोमॅटो मार्केटवर झाल्याचे अडते सांगत आहेत. दरम्यान आता आवक वाढून टोमॅटोचे दर स्थिर झाले आहेत. पुढील काळात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन दर स्थिर राहणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.