Bjp : रेडझोनचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल – बाळा भेगडे

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी देण्याबाबत लवकरच योग्य निर्णय

एमपीसी न्यूज – रेडझोनचा प्रश्न सोडवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू असून लवकरच रेडझोनचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास भाजपचे (Bjp)  मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.  पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी देण्याबाबत लवकरच योग्य निर्णय होईल असेही ते म्हणाले.

PMPML :पीएमपीएमएलची रातराणी बस सेवा गुरुवारपासून पूर्ववत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 30 मे ते 30 जून दरम्यान  लोकसभा मतदारसंघा मध्ये ‘विशेष जनसंपर्क अभियान (मोदी@9)’ संपन्न होत असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

भेगडे म्हणाले, युक्रेन आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. केंद्राने सातत्याने दर कमी केले. परंतु, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दर कमी केले नव्हते. शिंदे-फडणवीस सरकार येताच इंधनाचे दर कमी करत जनतेला दिलासा दिला. जलजीवन योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक तयार झाले. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी मिळाले पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहोत.  पण, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांवर दमदाटी केली. विश्वासात घेतले नाही. विश्वासात घेतले असते तर मार्ग निघाला असता. आजही याबाबत संभ्रमावस्था आहे. धरण साडेदहा टीएमसीचे आहे. शिल्लकसाठा दीड टीएमसी राहतो.

एक टीएमसी पाणी बाष्पीभवनात जाते असे जलसंपदा खात्याचा अहवाल आहे. धरणातील माती, दगड धोंडे यामुळे एक टीएमसी पाणीसाठा कमी केला जातो. प्रत्यक्षात साडे नऊ टीएमसी पाणीसाठा केला जातो. साडे सहा टीएमसी पाणी राहते. मावळचा भाग वाढत आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येकाला पाणी मिळावे हीच आमची भूमिका आहे. लवकरच याबाबत बैठक होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही भेगडे म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.