The relation between Jaya Bachchan & Aishwarya: सेलिब्रेटी सासू-सुनेच्या जोडीतील ‘सासूबाई’ आहेत ‘सुने’वर खूष!

The relationship between Jaya Bachchan & Aishwarya: Celebrity mother-in-law and daughter-in-law 'sasubai' is happy with 'Sunbai'! 'ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र तरीही बच्चन कुटुंबात असताना ती सर्वात मागे उभी राहते. उगाचच पुढे पुढे करत नाही. सर्वांचा आदर करते. विशेष म्हणजे ती खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे'

एमपीसी न्यूज – असं म्हटलं जातं की, सासू आणि सुनेचे नातं म्हणजे तुझं माझं जमेना माझ्यावाचून करमेना…पण काही काही सासू-सुनेच्या जोड्या याला अपवाद असतात. आणि ही जोडी जर फिल्मी दुनियेतील असेल तर तिच्याकडे नक्कीच चिकित्सकपणे पाहिले जाते.

अशीच एक सेलिब्रेटी सासू-सुनेची जोडी म्हणजे जया आणि ऐश्वर्या बच्चन होय. विश्वसुंदरी ऐश्वर्या सून म्हणून बच्चन कुटुंबात आली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण ऐश्वर्याने आपल्या नम्र वागणुकीने घरातल्या सगळ्यांची मने जिंकून घेतली. सासरेबुवा ‘बिग बी’ तर तिच्यावर खूष असतात. पण सासूबाई जया बच्चन यांनी देखील ऐश्वर्याची तोंड भरुन स्तुती केली.

अभिनेत्री जया बच्चन यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ऐश्वर्याची तोंड भरुन स्तुती करताना दिसत आहेत. त्यांना ऐश्वर्याचा कुठला गुण सर्वाधिक आवडला होता ज्यामुळे त्यांनी लग्नास होकार दिला, याबाबत त्या सांगताना दिसत आहेत.

‘ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र तरीही बच्चन कुटुंबात असताना ती सर्वात मागे उभी राहते. उगाचच पुढे पुढे करत नाही. सर्वांचा आदर करते. विशेष म्हणजे ती खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे’. ऐश्वर्याचे हे गुण जया बच्चन यांना प्रचंड आवडले होते. त्यामुळे त्यांनी अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नास होकार दिला होता.सोशल मीडियावर चर्चेत असणारा हा थ्रोबॅक व्हिडीओ ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्याही आधीचा आहे. त्यावेळी अभिषेकच्या लग्नाची चर्चा होती. परंतु बच्चन कुटुंबियांचा त्यांच्या लग्नास नकार होता असे म्हटले जात होते. या पार्श्वभूमीवर ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करण जोहरने जया बच्चन यांना ऐश्वर्या संबंधीत प्रश्न विचारला. या प्रश्नावर जया यांनी देखील दिलखुलास उत्तर दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.