Hinjawadi : भाड्याने घेतलेली कार पळवली

एमपीसी न्यूज – माय कार शोरूममधून भाड्याने घेतलेली कार भाडे न देता पळवून नेली. ही घटना फेब्रुवारी 2018 ते जुलै 2019 या कालावधीत घडली.

प्रेम जयलाल सिंग (वय 25, रा. माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश लक्ष्मण साळुंखे (रा. नागठाणे, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश साळुंखे याने प्रेम सिंग यांच्या माय कार शोरूम मधून स्विफ्ट कार (एम एच 14 / जी डी 7308) भाड्याने नेली. फेब्रुवारी 2018 ते जुलै 2019 यादरम्यान आकाश साळुंखे याने कारचे भाडे न देता कारचा अपहार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.