Pimpri News : आरक्षित जागा खासगी वाटाघाटीने घेणार ताब्यात

22 मालमत्ता धारकांना महापालिका देणार 14 कोटीचा मोबदला  

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधीत जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षणाने बाधीत क्षेत्राच्या मोबदल्यापोटी 22 मालमत्ता धारकांना तब्बल 14 कोटी 4 लाख 29 हजार 389  रूपये मिळणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.30) होणा-या स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्याने किंवा आरक्षणाने बाधीत जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याबाबत 6 ऑक्टोबर 2020 रोजी खासगी वाटाघाटी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत संबंधित मालमत्ता धारकांसमवेत सांगोपांग चर्चा करण्यात आली. त्यानुसार समितीने मंजुर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणाने बाधीत क्षेत्राचा मोबदला संबंधित मालमत्ताधारकास खासगी वाटाघाटीने देण्यास मंजुरी दिली.

गाव/प्रयोजन/क्षेत्र (चौरस मीटर)
रहाटणी -18 मीटर रस्ता-1531.11
पिंपरी -12 मीटर रस्ता-77.27
चऱ्होली-18 मीटर रस्ता-1417.75
पिंपरी वाघेरे-18 मीटर रस्ता-292
पिंपळे गुरव -18 मीटर रस्ता -1607.75
चिंचवड -34.50 मीटर रस्ता – 2399.82
पिंपळेसौदागर -खेळाचे मैदान-278

या अनुषंगाने लागणा-या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, वकील शुल्क आणि इतर अनुषांगिक खर्चास  मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.