Pimpri : थोडे में बेहतर करने की जिम्मेदारी अब हमारी – आर. के. पद्मनाभन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सध्या अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. उपलब्ध मनुष्यबळ घेऊन स्वतंत्र आयुक्तालयाच्या कारभार सांभाळणे अतिशय जिकरीचे आहे. त्यामुळे ‘थोडे में बेहतर करने की जिम्मेदारी अब हमारी है’ असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले. 

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी 4 हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पोलीस आयुक्त, पुणे शहर आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून 2 हजार 207 पदे वर्ग करण्यात येणार आहेत. तर उर्वरित 2 हजार 633 पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. त्यापैकी 60 टक्के पदे पहिल्या, 20 टक्के दुस-या आणि उर्वरित 20 टक्के तिसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया तसेच वर्ग करण्याबाबत पोलीस महासंचालकांसोबत 16 ऑगस्ट रोजी बैठक होणार असल्याचेही पद्मनाभन म्हणाले.

सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातून वाहतूक शाखा, गुन्हे शाखा आणि अन्य विविध शाखा तयार करून मनुष्यबळ पुरवावे लागणार आहे. थोडे मनुष्यबळ सर्व शाखांना पुरविणे ही मोठी तारेवरची कसरत आहे. मनुष्यबळासोबत विविध शाखांसाठी इमारती, साहित्य व साधने यांची देखील जमवाजमव करण्याचे काम सुरु आहे. मनुष्य बळा एवढेच साहित्य व साधनांची उपलब्धता देखील तेवढीच महत्वाची आहे. शून्यातून सर्व उभारणी करायची असून त्यातही उत्तम ध्येय गाठायचे आहे, असा विश्वास देखील पद्मनाभन यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.