मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Alandi News : आळंदी मध्ये वारकरी भाविकांचा परतीचा प्रवास सुरु

एमपीसी न्यूज : दि.22 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न झाल्यानंतर दि.23 रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांनी एस, टी, ने व त्यांनी आणलेल्या खासगी छोट्या मोठ्या चारचाकी वाहनांनी आपला आपल्या गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला आहे.

काही भाविकांनी काल दुपारी परतीचा प्रवास केला. तर काहींनी काल आळंदी मध्ये राहून आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी वारकरी सांप्रदायिक ग्रंथसाहित्य वस्तू,घर उपयोगी वस्तू,लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी या खरेदींचा आनंद घेतला.तसेच कार्तिकी यात्रे निमित्त नदीपलीकडे मनोरंजनासाठी विविध खेळ व उंच पाळण्यासह विविध प्रकारच्या राइड्स नागरिकांसाठी आलेल्या आहेत त्याचा काहींनी आनंद लुटला.

Alandi News: संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी माझे समाधी दर्शन झाले हे माझे भाग्यच:- केंद्रीय मंत्री प्रहलाद सिंह पटेल

बुधवार रोजी सकाळी प्रदक्षिणा रस्ता, चाकण चौक ,वडगांव रस्त्या, गोपाळपुरा इ.विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या परतीचा प्रवास करण्याऱ्या वाहनांची व डोक्यावर मोठ्या पिशव्यासह पायी चालणाऱ्या भाविक वारकऱ्यांची शहरातील रस्त्यावर गर्दी दिसून येत होती.

नदीपलीकडील एस. टी. स्टँड वर सुद्धा एस. टी.प्रवास करून आपल्या गावी जाण्यासाठी येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तसेच परतीच्या प्रवासासाठी भाविक नागरिक आपल्या सोबत आणलेल्या वस्तूंची आवरा आवर करताना दिसून येत होते.दि.23 रोजी रात्री 9:30 ते 12:30 श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे श्रींचा छबिन्याचा कार्यक्रम पार पडल्या नंतर या वर्षीच्या कार्तिकी यात्रेची सांगता होणार आहे.

Latest news
Related news