Wakad : घरफोडी करून चोरट्याने मोत्यांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरातून रोकड आणि मोत्यांचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सकाळी पवार नगर थेरगाव येथे उघडकीस आली.

निखिल सुलील पेंटा (वय 53, रा. पवार नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल गुरुवारी रात्री कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून 50 हजार रूपयांची रोकड आणि 15 हजार रूपये किमतीचे तीन मोत्याचे सेट चोरून नेले. निखिल शुक्रवारी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.