Pimpri : रोकडेश्वर आधार फाऊंडेशनने समाजात भरीव कार्य करावे

एमपीसी न्यूज – शहरात अनेक समाजपयोगी कामे करणा-या संस्था कार्यरत आहे. रोकडेश्वर फाऊंडेशनने हे असेच कार्य करावे. विविध प्रकारचे शिबिर, निराधार महिलांना व मुलांना सोयी सुविधा पुरविणे, गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींचे मोफत विवाह सोहळे आयोजित करावे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात भरीव कार्य या संस्थेने करावे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे व्यक्त केले.

रोकडेश्वर आधार फाऊंडेशन या नवनिर्वाचित संस्थेचा उदघाटन समारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर राहूल जाधवस उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, नगरसेवक शीतल शिंदे, राजू मिसाळ, शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.