Maval : वाऱ्यामुळे उडून गेलेले तिकोणागडावरील मंदिराचे छत अवघ्या पाच दिवसात केले दुरूस्त

The roof of a temple on Tikona Fort was repaired within 5 days after it was blown due to heavy winds and thunderstorm in Maval

एमपीसी न्यूज – किल्ले तिकोणागडावरील वितंडेश्वर मंदिराचे छत पाच दिवसा पूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे उडुन गेले होते. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था, वडगाव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे या संस्थेच्या मावळ्यांनी मंदिराची दुरुस्ती नुकसानीच्या पाच दिवसांतच केली.

पाच दिवसांपूर्वी मावळ भागात आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका तिकोणागडावरील वितंडेश्वर मंदिराला बसला. या वाऱ्यामुळे गडावरील वितंडेश्वर मंदिराचे लोखंडी छताचा सांगाडा उडून गेला. उडून गेलेल्या छताची माहिती समजताच मावळ अँडव्हेन्चर संस्थेचे संस्थापक विश्वनाथ जावळीकर व शिवदुर्ग संस्था लोणावळा यांनी दरीत पडलेला लोखंडी सांगाडा व पत्रे वर काढुन घेतले.

मंदिराच्या डागडुजी साठी आवश्यक एक ब्रास वाळु तसेच इतर साहित्य पोहचवणे गरजेचे होते.‌गडमाथ्यावर प्रचंड वार्याचा वेग लक्षात घेता हे काम जोखमीचे होते मात्र मावळ्यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारून अथक परिश्रम करत गडपायथा पासुन गडमाथ्यावर तीन दिवसात सर्व साहित्य पोहचवले.

_MPC_DIR_MPU_II

सर्व साहित्य गडावर पोहचवल्यानंतर उरलेलं डागडुजीचे काम उरकून घेण्यात आले. येणारा पावसाळ्यापूर्वी हे काम करणे गरजेचे होते मावळ्यांनी सर्व जोखीम पत्कारून हे डागडुजीचे काम नुकसानीनंतर पाच दिवसांतच पूर्ण केले.

गडावरील मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी वडगाव मावळ येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे या संस्थेच्या मावळ्यांनी मेहनत घेतली.

तिकोना गड चढाई साठी सोपा असला तरी गडावरील मंदिरासाठी डागडुजीचे साहित्य पोहचवणे हे जोखीमेचे काम अतिशय कमी अवधीत पूर्ण करण्याची किमया या मावळ्यांनी साधली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.