Pune – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील 25 वर्षीय पोलीस कर्मचा-याचे दु:खद निधन

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील 25 वर्षीय पोलीस कर्मचा-याचे आज गुरूवारी (दि.1) सिंहगड रोड येथील जगताप हॉस्पिटलमध्ये दु:खद निधन झाले.

दिगंबर सतीश थोरात(वय 25) असे निधन झालेल्या  पोलीस कर्मचा-यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  दिंगबर थोरात काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून रजेवर होते.  आज सकाळी त्यांना त्रास होऊ लागल्याने ते सिंहगड रोड येथील जगताप हॉस्पिटलमध्ये येथे उपचारासाठी गेले होते. उपचारादरम्यान त्यांना अॅटॅक आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिगंबर थोरात हे अविवाहित होते.

त्यांच्यामागे त्यांची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.