Amit Shah : नव्या भारतीय संसदेमध्ये चोल राजांचा राजदंड (सेंगोल) होणार स्थापन

एमपीसी न्यूज – भारताच्या नवीन संसदेच्या निमित्ताने एक परंपरेची पुनर्स्थापना होत आहे, निमित्त आहे सेंगोल तामिळ चोल शासक यांचा राजदंड पुन्हा प्रस्थापित करण्यात येणार असल्याची घोषणा भारताचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज केली.

Alandi : पालखी सोहळा रथापुढील 1 ते 27 व मागील 1 ते 20 या दिंड्याची भक्त निवासमध्ये बैठक

इंग्रजांकडून राजसूत्र हाती घेताना राज्यहस्तांतराचे प्रतीक म्हणून हा “सेंगोल “ इंग्रज गर्व्हनरकडून भारताचे प्रथम पंतप्रधान पंडीत नेहरुंनी 14 अगस्त 1947 रोजी स्वीकारला होता. चोल सम्राट आपल्या राज्याभिषेकाच्यावेळी जो राजदंड हाती घेत तो राजदंड ज्यास तमिळमध्ये सेंगोल म्हंटले जाते तो मुद्दाम प्रतीक म्हणून तमिळनाडूवरून दिल्लीला या समारंभासाठी 1947 ला पाठविण्यात आला होता.

ते राजसत्तेचे प्रतीक नंतर प्रयागराज म्युझियममध्ये ठेवण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र सोहळ्यास 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे, भारताची नवीन संसद भवन बांधून तयार करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा या आठवड्यात होणार आहे. त्या निमित्ताने हा “सेंगोल” राजदंड पुन्हा आपल्या संसदेमध्ये अध्यक्षांच्या स्थानाजवळ विधीवत स्थापन होणार आहे.

भारतीय परंपरेमध्ये राजदंडास विशेष महत्व आहे. रामायण , महाभारतामध्ये याचे वर्णन आढळून येते. राज्याभिषेक सोहळा या विधी मधील महत्वाचे अंग म्हणजे “राजदंड ग्रहण विधी.” छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा रायगडावरील राज्यभिषेकाच्या वेळी राजदंड धारण केला होता.

आजही भारतातील न्यायपालिकेमध्ये एक न्यायदंड असतो.  प्रमुख न्यायाधीश न्याय देण्यासाठी न्यायालयाच्या खुर्चीवर बसण्यासाठी येतात, तेव्हा त्याचा पट्टेवाला चोपदार हातामध्ये न्यायदंड घेऊन पुढे चालत असतो. ही कृती न्यायसत्तेचे प्रतीक असते. चेापदाराने दंड स्थापन केल्यावर न्यायाधीश न्यायासनावर स्थानापन्न होत असतात.

राजदंड ही एक अदृश्य शक्ती आहे ज्या पुढे सर्व नतमस्तक होत असतात. राजदंड या नावातच कायदा, न्याय आणि शासन आहे. एक अश्वासन आहे, राजदंड आहे तिथे न्याय आहे. आज आपल्या संसदेत पुन्हा एक “सेंगोल” रुपी राजदंड स्थापन होतो आहे. खऱ्या अर्थाने न्यायाचे शासन सुरु होण्याचा प्रारंभ आहे.

लोकशाहीमध्ये कोणी राजा नाही तर, लोकांमधून आलेले त्यांचे प्रतिनिधी आहेत.  तरी सुध्दा कायद्याचे राज्य म्हणून हे प्रतिनिधी आपल्यातला एक प्रतिनिधी निवडून त्यास प्रमुख प्रधान म्हणजे पंतप्रधान नेमतात व त्याच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार सुरु होतो. असेही शहा (Amit Shah) म्हणाले.

PCMC : उद्यान विभागातर्फे उद्या सीड बॉल्स कार्यशाळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.