Pune News : आई-वडील गावी गेल्यानंतर शाळकरी मुलीने उचलले धक्‍कादायक पाऊल

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आई वडील गावी गेले असता एका शाळकरी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. रिचा दिलीप देवकर (वय 14) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. रिचाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रिचाने घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे आढळले. तिला तातडीने खाली उतरून ससून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी पाहणी केली असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

रिचाने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने तिचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. दोनच दिवसापूर्वी रिचाचे आई वडील गावी गेले होते. रिचा आणि तिचा भाऊ दोघेच घरी होते. भाऊ घरा बाहेर गेल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तिने अचानक आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.