Pune : सिटिंग सीट ज्याचे त्याला मिळाले, मला उमेदवारी हा काही उपकार नाही – विजय शिवतारे

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत सिटिंग सीट ज्याचे त्याला मिळाले, मला मिळालेली पुरंदरमधून उमेदवारी हा काही उपकार नाही, अशी भूमिका जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मांडली.
पत्रकार संघात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जागांचा निर्णय घेतला, अशी सारवासारवही त्यांनी यावेळी केली. पुणे शहरात एकही जागा मिळाली नाही, भाजपने आठही जागांवर उमेदवार घोषित केले. भोसरीची हक्काची जागा गमावली, असे विविध प्रश्न उपस्थित केले असता, शिवतारे यांनी तो माझा विषय नसल्याचे सांगत बोलणे टाळले. पुण्यातील शिवसैनिक नाराज आहेत, त्याची समजूत उद्धव ठाकरे घालणार असल्याचे शिवतारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.