Pune : तांबडी जोगेश्वरीचे ढोल-ताशा पथक ठरले लक्षवेधी

ध्वजांमधून दिला एकात्मतेचा संदेश

एमपीसी न्यूज – मानाच्या पहिल्या गणपतीनंतर मनाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे ढोल-ताशा पथक यंदाच्या मिरवणुकीत लक्षवेधी ठरले. 

आपली जात, धर्म, पंथ फक्त : भारतीय, असा संदेश ध्वजावर लिहून उत्कृष्ट कला सादर करण्यात आली. हातात राष्ट्रीय एकात्मतेचे ध्वज घेऊन कला सादर करतानाचे दृश्य मनोहारी होते. यावेळी उपस्थित अनेक गणेशभक्तांनी त्याचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.