India vs England 2nd T20 : इंग्लंडविरुद्धची दुसरी टी-20 लढत आज

एमपीसी न्यूज : सलामीच्या लढतीत दारुण पराभव झाल्याने ‘टीम इंडिया’ उद्या, 14 मार्चला दुसऱया टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर पलटवार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘टीम इंडिया’कडे रथी-महारथी खेळाडू असल्याने सलामीच्या विजयाने इंग्लंडचा संघ हुरळून गेलेला नाहीये.

विराट कोहलीच्या सेनेकडून पलटवार होणार याची कल्पना असल्याने ओएन मॉर्गन उद्या कुठल्या रणनीतीनिशी मैदानावर उतरणार याकडेही क्रिकेटशौकिनांच्या नजरा असणार आहेत.

रोहितला संधी मिळणार

सलामीच्या लढतीत आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर ‘टीम इंडिया’ला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे रोहित शर्माला उद्याच्या लढतीत खेळविण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. रोहित संघात आल्यास शिखर धवन किंवा लोकेश राहुल यापैकी एकाला संघाबाहेर व्हावे लागणार आहे.

एका फिरकीपटूची गच्छंती

सध्या युजवेंद्र चहल हिंदुस्थानचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे उद्या दोन फिरकी गोलंदाज घेऊन खेळण्याची रणनीती बनविल्यास वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला खाली बसावे लागेल. अशा वेळी दीपक चहर व राहुल तेवतिया यांच्यापैकी एका गोलंदाजाला संधी द्यावी लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.