Pimpri : शिवसेना आयोजित दापोडी येथील शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये विविध शासकीय दाखले एकाच ठिकाणी व एकाच दिवशी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, अपंग दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न, रहिवासी दाखले, तसेच रेशनकार्ड संबंधीची सर्व कामे एकाच ठिकाणी जागेवर उपलब्ध करण्याची व्यवस्था उभारण्यात आली होती. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, पिंपरी संघटिका सरिता ताई साने पिंपरी विधानसभा उपसंघटिका शैला पाचपुते,मंगला घुले पिंपरी सन्मयवक रोमी संधू , ज्ञानेश्वर शिंदे, माधव मुळे विभागप्रमुख राजू सोलापुरे, उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, रियाज शेख, नामदेव घुले, अर्जुन जम, शाखाप्रमुख विनोद जाधव, रवी कोवे, सुनील ओव्हाळ, संतोष गायकवाड, उपस्थित होते.

आपल्या भाषणात संपर्क नेते बाळा कदम यांनी म्हटले की, शिवसेनेने सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची व त्यांना आत्मनिर्भर करण्याची जपलेली बांधिलकी म्हणजे पक्षाचा पाया असल्याचे नमूद केले. तर आमदार चाबुकस्वार यांनी म्हटले की, पिंपरी विधानसभा या मतदारसंघातील पिंपरी, मोहननगर, आकुर्डी या तीन ठिकाणी यापूर्वी शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी झाला असून सुमारे आठ हजार नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाला असल्याची माहिती दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी सर्वांचे स्वागत केले तर संजय नाना काटे यांनी आभार मानले. या शिबिरामध्ये फुगेवाडी, दापोडी व बोपखेल भागातील सुमारे ३ हजार स्त्री-पुरूषांनी सहभाग घेतला. कार्यक्रम मा. नगरसेवक संजय नाना काटे, शिवसेना उपशहर प्रमुख, तुषार भाऊ नवले, युवती सेना अधिकारी प्रतीक्षा घुले, युवासेना विभागसंघटक निलेश हाके, युवानेते गोपाळ मोरे यांनी पार पाडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.