Pune Crime News : अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट राहिल्याने उघडकीस आला धक्कादायक प्रकार

एमपीसी न्यूज : 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असू यातील आरोपीसुद्धा अल्पवयीन आहे. ऑक्टोबर 2020 पासून वेळोवेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यासाठी आहे. त्यांच्या 17 वर्षीय मुली सोबत एका 17 वर्षीय तरुणाने मैत्री केली. त्यानंतर फिर्यादी घरी नसताना संबंधित अल्पवयीन तरूण त्यांच्या घरी यायचा आणि तरुणीसोबत शरीर संबंध ठेवायचा.

ऑक्टोबर 2020 पासून वेळोवेळी हा प्रकार घडत होता. दरम्यान पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेले असता ती वीस आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.