Kasarwadi News : दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितल्याने दुकानदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – शेजारच्या दुकानात काम करणा-या कामगारांनी एका व्यक्तीच्या दुकानासमोर गाडी लावली. त्यामुळे दुकानदाराने दुकानासमोरून गाडी काढण्यास सांगितले. त्यावरून चार जणांनी मिळून दुकानदाराला बेदम मारहाण केली. ही घटना 21 मे रोजी सकाळी कासारवाडी रेल्वे स्टेशन जवळ घडली.

अमृतसिंग लालसिंग गिल (वय 38, रा. शगुन चौक, पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद पटेल यांच्या दुकानात काम करणा-या चार कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र कुमार धनशेट्टी हे त्यांच्या कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या दुकानात गेले. त्यावेळी आरोपींनी एक कार फिर्यादी यांच्या दुकानासमोर लावली होती. आरोपी त्या कारचे सीएनजी कीट फिटिंग करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना त्यांच्या दुकानासमोरून कार बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. फिर्यादी हे दुकानाच्या बाहेर आले असता आरोपींनी त्यांना लोखंडी पंच, हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी डोक्यावर, पाठीवर, पोटावर, हातावर मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.