_MPC_DIR_MPU_III

Entertainment News : हर्षल आल्पे लिखित, दिग्दर्शित साखळी हा लघु चित्रपट प्रदर्शित

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नगरसेवक निखिल भगत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने एकतेचे महत्त्व सांगणारा “साखळी” हा चित्रपट आपला कट्टा या सदरात चार डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

लेखक दिग्दर्शक हर्षल आल्पे यांनी या चित्रपटाची पटकथा तसेच दिग्दर्शन केले आहे, तर या चित्रपटाची संकल्पना आणि कथा जुई रणदिवे यांची आहे, तर या लघु चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी श्वेदांग भोसले व  विशाल कुलकर्णी यांनी केले आहे. याचे संकलन उदयोन्मुख व ताज्या दमाचे कलाकार अनिरुद्ध जोशी  आणि श्वेदांग भोसले हे करत आहेत, तर हर्षल यांना दिग्दर्शनात समीर दिवाकर यांनी सहाय्य केले आहे. या लघु चित्रपटाला सम्राट काशीकरयांनी संगीत दिले आहे.

या लघुचित्रपटात अनिरूद्ध जोशी, सायली बुधकर, दक्षा ओक, हरिष पाटील, समीर दिवाकर, आदित्य धामणकर हे प्रमुख भूमिका आहेत आणि विद्याधर पुराणिक व डाॅ हेमंत बेडेकर हे एका विशेष भूमिकेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तळेगावातील निसर्गरम्य परिसरात या लघुचित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाला संविद पाटील , अभिषेक कुलकर्णी यांनी विशेष सहाय्य केले आहे.

मैत्रीची अविभाज्य साखळी आयुष्यात कधीही तुटू नये, स्वप्नातसुद्धा असे होऊ नये, अन्यथा जीवन एक रहस्यमय पट बनते.

आपल्यातील एकतेची ही अशी साखळी कधीच तुटली नाही पाहिजे, या वाक्यावरील या लघु चित्रपटाला आत्ता पासूनच सर्व थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळत आहे. या लघुचित्रपटाला लोकप्रिय तसेच कार्यक्षम नगरसेवक निखिल जी भगत यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे तसेच आपला कट्टा ने याची प्रस्तुती केली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.