Pimpri : गायकाच्या सुरांनी रविवारी पवनाकाठी रंगणार दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनतर्फे येत्या रविवारी (दि. 27) पवनाकाठी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गायकांच्या सुरांनी दिवाळी पहाट रंगणार आहे.

चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात पवना नदीकाठी रविवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत दिवाळी पहाट रंगणार आहे. ऊँ कार रवींद्र खरे, गायक हर्ष वांगीकर, अक्षय घानेकर, कोमल कनकाई, प्रणाली काळे यांच्या गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे.

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कलाकारांच्या सुरेल मैफलीस रसिकांनी आवर्जून हजेरी लावावी. दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रतिष्ठानचे धनाजी बारणे, गजानन चिंचवडे, रवी नामदे, बशीर सुतार, निलेश बारणे, बाळासाहेब वाल्हेकर, विश्वजीत बारणे, हनुमंत माळी यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.