Pimpri News : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मधील विद्यार्थ्यांचा नारा “माझी शाळा.. माझी मेट्रो.. माझ्या पुण्यनगरीत”

एमपीसी न्यूज : नुकताच चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने, पिंपरी चिंचवड मधील पहिल्या संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनचा अधिकृत अभ्यास दौरा केला. मेट्रोस्टेशनची कलाकृती ही माझी संतांची नगरी अशी होती. स्टेशन वर वारकऱ्यांच्या प्रतिकृती आणि चित्ररूपे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.

विद्यार्थ्यांना आणि पालकांना मेट्रोची कार्यपद्धत, आधुनिक यंत्रांची रचना, मेट्रोतील सोई सुविधा, सुरक्षितता, तिकीट रचना यांची प्रात्यक्षिके देण्यात आली तसेच शिस्तबद्धता, स्वच्छता, नीटनेटकेपणा यांची माहिती देण्यात आली. यावेळी मेट्रोचे अभियंता श्री. अमोल यांनी मेट्रोमुळे येणाऱ्या काळात इंधन, वेळ याची बचत होणार असून प्रदूषण कमी करणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

या अभ्यास दौऱ्यात पुणे मेट्रो आणि शाळेच्या वतीने विविध स्पर्धा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये जादूचे कार्यक्रम, कठपुतली कार्यक्रम, मावळा बोर्डाचा खेळ, आदी बौद्धिक व मनोबल उंचावणारे खेळ दाखवण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला. मेट्रो सोबत फोटो घेतले. योगायोगाने शाळेतील एका विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता, त्याचा वाढदिवस मेट्रो मध्ये साजरा केला. विद्यार्थ्यांनी मेट्रो साठी गाणे म्हणले आणि मेट्रोचा जयघोष केला.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गाणी म्हणली. विनोद, चुटकुले सांगितले. गप्पा मारल्या. नृत्ये केली तसेच विविध एक मिनिट स्पर्धा आयोजित केल्या, उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिके दिली. विद्यार्थ्यांना ई-बाईकची राईड करण्यात आली.

विशेष वेशभूषेतील चार्ली चॅप्लिन, डोरेमान आणि छोटा भीम यांनी विद्यार्थी आणि पालकांची मने जिंकली. प्रा. महादेव वाघमारे आणि श्री. विजय साकोरे यांनी विविध नकला केल्या. विद्यार्थी पालकांच्या बरोबर जेष्ठ नागरिकांनीही गाणी व संगीत नृत्याचा आनंद घेतला.

संचालिका कमला बिष्ट यांनी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल नेहमी विविध उपक्रम राबवित असते असे सांगितले. केवळ एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षा प्रात्यक्षिकासह माहिती दिल्यास विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढते असे मत संचालक डॉ. संजय सिंग यांनी व्यक्त केले.

उपस्थित विद्यार्थी पालकांना कात्रज समूहाच्या वतीने आईस्क्रीम, चितळे समूहाच्या वतीने चिक्की भेळ, शाळेच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी आणि पालकांनी हा अभ्यास दौरा कायम आठवणीत राहील असे आमच्याशी बोलताना सांगितले. मेट्रो स्टेशन मधील छोट्या मुलांची धमाल बघून मेट्रो तील सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी शाळेचे संचालक डॉ संजय सिंग, श्री. प्रशांत पाटील, श्री. देवदत्त कशाळीकर, श्री. महादेव वाघमारे, श्री. विजय साकोरे, श्री. विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे मेट्रो च्या वतीने श्री. टी मनोज कुमार डॅनियल (डी जी एम ), श्री. अमोल यांनी उत्कृष्ट सहकार्य केले. त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोविड नियमांचे पालन करून अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

देबोश्री भोंडवे, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाळी डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, तेजश्री शिंदे , सिद्धी सावंत, कल्यानी साजन, शोभना सिंग आणि पुष्कर कापरी आदी शिक्षिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.