Talegaon News : तळेगाव कचरा डेपोची धुमसत असणारी आग विझविण्यात अखेर यश आले

तळेगाव दाभाडे – गेले काही महिने तळेगाव कचरा डेपोची धुमसत असणारी आग विझविण्यात अखेर यश आले आहे. त्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली असून त्यांनी ह्या मोहिमेत घटनास्थळी थांबून धुराच्या त्रासापासून तळेगावकरांची सुटका केली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा कचरा डेपो (मुरखळा) या ठिकाणी गेल्या काही  महिन्यांपासून आग लागल्याने नगरपरिषदेच्या कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे  या आगीचा धूर वार्‍याच्या दिशेप्रमाणे संपूर्ण शहरात सोमाटणे फाटा, 65/23 एरिया,नालबंद गल्ली, भोईआळी, भेगडेआळी, गणपती चौक, बाजारपेठ, रावकाॅलनी, संभाजीनगर, तुकारामनगर  याठिकाणी त्रासदायक होता. धुरामुळे शेतकरी व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता.

या घटनेची लागलीच दखल घेऊन नवनिर्वाचित आरोग्य विभागाचे सभापती किशोर भेगडे यांनी  पेटत असलेला धुपत असलेला मुरखळा कचराडेपो त्या ठिकाणी जाऊन शेजारील ओढ्यावर मातीचा बांध घालून पाणी अडवले तीन एचपीचा सबमर्सीबल पंप बसवून पाण्याची व्यवस्था केली आणि अग्निशामक दलाच्या वाहनातून     कचराडेपोवर पाच दिवस पाणी फवारणी करून आग आटोक्यात आणण्यासाठी भेगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

त्याबद्दल नागरिकांमधून विशेष कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. त्याठिकाणी कायमस्वरूपी आग विझविण्यासाठी यंत्रणा उभी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

कचराडेपोची सर्व आग येत्या पंधरा दिवसांत विझविण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी संयम ठेवावा व धीर धरावा असे आवाहन स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.