Maval News : ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या हरणटोळ सापाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले

एमपीसी न्यूज – ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या हरणटोळ सापाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. स्केल आणि टेल्स वाईल्डलाईफ अनिमल रेस्क्यू फाउंडेशन आणि वाईल्डलाईफ रेस्क्यूअर्स ऑफ मावळ यांच्या वतीने हे रस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. गहुंजे, मावळ गावात आज आज (दि.11) सकाळी 8.30 वा ही घटना घडली.

गहुंजे, मावळ गावात एका ट्रॅक्टरमध्ये साप बसला असल्याची माहिती रेस्क्यूअर्स टिमला मिळाली. टीमच्या वतीने  विशाल बोडके, रितेश साठे, आशिष चांदेकर, निखिल कुंभार, टिपूसुलतान मुजावर, फिलिप सुटातीराजन, ऋषिकेश शिरसाठ घटनास्थळी पोहोचले. ट्रॅक्टरमधील साप हरणटोळ असल्याचे टिमच्या लक्षात आले. गहुंजे गावामध्ये हा साप यापूर्वी आढळला नव्हता. टीमच्या सदस्यांनी सापाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मावळ तालुक्यात वडगाव, कामशेत, लोणावळा येथे हा साप अधिक आढळून येतो. हरणटोळ सापाबद्दल खूप असे गैरसमज आहेत. हा साप टाळू फोडतो, डोळ्याला चावतो. या सापाचे एक वैशिष्टय आहे की, हा झाडावर राहणारा साप आहे आणि त्यामुळे एखादा माणूस झाडाखालून जात असेल तर त्याला माणसाचे तोंड किंवा डोके जवळ आले की तो स्वरक्षणासाठी चावल्याच्या घटना घडल्या आहेत.

निमविषारी असल्यामुळे या सापाचे विष लहान पक्षी, बेडूक्, उंदीर् ह्या सारख्या प्राण्यांवरच असरदार आहे. मनुष्य व इतर मोठ्या प्राण्यांवर हरणटोल सापाचे विष असर करत नाही, असे रेस्क्यू टिमच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.