_MPC_DIR_MPU_III

Pune : आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’,

आमदार मेधा कुलकर्णींच वादग्रस्त विधान

एमपीसी न्यूज – आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या  घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. 

_MPC_DIR_MPU_IV

शुक्रवार (दि.3) रोजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. यावर त्यांना विचारलं असता मेधा कुलकर्णी यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

_MPC_DIR_MPU_II

शासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया आ मेधा कुलकर्णी यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यलयासमोर ठिय्या केलं त्यावेळी गिरीश बापट यांनी आंदोलकांची निवेदन स्वीकारत आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील आमदारांच्या या विधानाने नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.