Pune : १०० टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदीचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेतर्फे यंदाचा गणेश उत्सव पर्यावरण पूरक करण्याचा दृष्टीकोनातून अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून घरच्या घरीच गणेश विसर्जन उपक्रमाला प्रोसाहन देण्याच्या दृष्टीकोनातू पालिके तर्फे २ किलो अमोनियम बायकार्बोनेट मोफत वाटले जाणार आहे. यासाठी १०० टन अमोनियम बायकार्बोनेटखरेदीच्या प्रस्ताव स्थयी समितीच्या मंजुरीला  ठेवला आहे.

गेल्या वर्षी देखील हा उपक्रम महापालिकेने राबवला होता. त्यानुसार घरच्याघरी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्याच्या दृष्टीकोनातू ५० हजार लोकांना हे क्षेत्रीय कार्यालय आणि प्रमुख गणेश मंडळांमार्फत २ किलो अमोनियम बायकार्बोनेट देण्यात येणार आहे. यासाठी “राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टीलायझर्स’ यांच्याकडून “प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी 100 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदीचा  प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.