Maharashtra Political Crisis : राज्य सरकार पडतंय त्याच दु:ख नाही – शेट्टी

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या सर्व घडामोडींवर राजू शेट्टी म्हणाले की, महाविकास आघाडीच सरकार (Maharashtra Political Crisis)  पडतय त्याचे मला अजिबात दु:ख नाही.

 

Maharashtra Political Crisis : आपल्यासोबत 50 पेक्षा जास्त आमदार – एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकार पडतय (Maharashtra Political Crisis) त्याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण आम्ही दोन महिन्यांपुर्वीच या सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे.हे सरकार आता जनताभिमुख राहिलेल नाही, असे शेट्टी म्हणाले.

 

 

 

भारतीय जनता पक्ष ज्या पध्दतीनं पाशवी वृत्तीने सरकार हस्तगत करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. भाजपकडून मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडल जातयं. हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.