Talegaon : सोमाटणे टोल नाक्यासंदर्भात राज्य शासनाने भूमिका स्पष्ट करावी

एमपीसी न्यूज – सोमाटणे टोलनाका बंद करण्यासाठी दिवंगत नेते किशोर आवारे यांनी चार दिवस उपोषण केले. राज्य शासनाच्या आश्वासना नंतर ते उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान किशोर आवारे यांची हत्या झाली. त्यानंतरही त्यांचे कार्यकर्ते हे आंदोलन पुढे नेत असून राज्य शासनाने या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Alandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलांची मिरवणूक

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक, जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत, महेश पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

किशोर आवारे यांनी सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी 11 ते 14 मार्च या कालावधीत उपोषण केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाच्या वतीने मध्यस्थी करत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आवारे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान 12 मे रोजी आवारे यांची हत्या झाली.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून सोमाटणे टोलनाक्या संदर्भात शासनाचा निर्णय जाहीर करावा. टोलनाका बंद करून जनतेला या त्रासातून मुक्त करावे. जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत आणि पदाधिकाऱ्यांशी शासनाने चर्चा करून बेकायदेशीर टोल नाका बंद करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. अन्यथा याबाबत पुन्हा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले, कल्पेश भगत हे जनसेवा विकास समितीचे युवा नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही टोलनाक्याचे व तसेच इतर समाजहिताची कामे पुढे नेणार आहोत. सोमाटणे टोल नाका बंद होण्यासाठी किशोर भाऊंनी मोठा लढा दिला होता. त्यांची ही इच्छा पूर्ण करणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.