Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,286 जण कोरोनामुक्त , 2,438 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 4 हजार 286 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्यानं 2 हजार 438 कोरोना रुग्णांची वाढ राज्यात झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 71 हजार 552 एवढी झाली आहे. त्यापैकी 18 लाख 67 हजार 988 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 52 हजार 288 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 101 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 40 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के एवढं झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 34 लाख 43 हजार 229 नमूण्यांपैकी 19 लाख 71 हजार 552 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 699 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 468 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

परभणीतील मुरुंबा गावात रविवारी (दि.10) 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला असल्याची माहिती समोर आली. त्यापाठोपाठ आता मुंबई, ठाणे, बीड व रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे.

बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.