Maharashtra Corona Update : राज्यात आज 68,631 नवे कोरोना रुग्ण, 503 मृत्यू 

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 68 हजार 631 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 38 लाख 39 हजार 338 वर जाऊन पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 31 लाख 06 हजार 828 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 45 हजार 654 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.92 टक्के एवढं झाले आहे.

चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 70 हजार 388 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 60 हजार 473 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 36 लाख 75 हजार 518 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 529 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 38 लाख 54 हजार 185 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.