Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 4,092 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात रविवारी देखील उच्चांकी रुग्ण वाढ झाली. दिवसभरात राज्यात 4 हजार 092 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच, 1 हजार 355 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 75 हजार 603 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी आज 1 हजार 355 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

राज्यात सध्या 35 हजार 965 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 95.70 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.