Pimpri: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार – महापौर जाधव

महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविणार 

एमपीसी न्यूज – पिंपरीतील महात्मा फुले पुतळा स्मारकात महापालिकेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविण्यात येणार आहे, अशी माहिती, महापौर राहुल जाधव यांनी दिली.

सावित्रीबाई फुले स्मारक समिती आणि पदाधिका-यांची महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मानव कांबळे, वैजनाथ शिरसाठ, बन्सी परांडे, नंदा करे, आनंदा कुदळे, हणमंत माळी, अ‍ॅड. रवींद्र कुदळे, विश्वास राऊत, गिरीश वाघमारे, लक्ष्मण राऊत, विलास गव्हाणे, नीरज कडू, गुलाब पानपाटील, राजकुमार परदेशी, विलास गव्हाणे, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, लक्ष्मीकांत कोल्हे, प्रभावती गाडेकर, महादेव सिंदे, आर. एम़ पवार बैठकीला उपस्थित होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या मागे भोसरी रस्त्यावर महात्मा फुले स्मारक उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी महात्मा फुले यांचा पुतळा आहे.

ग्रंथालय सुरू करावे, सांस्कृतिक हॉलचे नामकरण, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करणे, फुले दाम्पत्यावर चित्रफीत करावी. स्मारकाच्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारावा. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. कारंजे सुरू करावेत. विद्युत रोषणाई करण्यात यावी. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी उभारावी, दिशादर्शक फलक चौकात उभारावा, स्मारकाच्या ठिकाणी फुले दाम्पत्यावर म्युरल्स तयार करुन बसवावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘महात्मा फुले स्मारकात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. जिना हा लोखंडी ऐवजी आरसीसीचा करण्यात येणार आहे. विद्युत रोषणाई केली जाईल. ही कामे तातडीने करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.