Yerawada – डोक्यात दगड घालून तरूणाची निर्घृण हत्या; एकाला अटक

एमपीसी न्यूज – एका तरूणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सोमवारी (दि.29) पहाटे 4 च्या दरम्यान संगमवाडी परिसरात बॉम्बे सॅपर्स येथील वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत घडली.

नरसिंग कुमार गर्ग (वय 38. रा. मूळ राजस्थान) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गेश गोस्वामी (वय 29) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण नरसिंग गर्ग आणि दुर्गेश गोस्वामी हे दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करत होते. सुतारकामाचे 2 हजार रुपये गर्ग याने गोस्वामी याला द्यायचे होते. परंतु पैसे देत नव्हता. रविवारी दुर्गेशने नरसिंगकडे पुन्हा पैसे मागितले आणि नरसिंगने दुर्गेशला लोहगावहून बोलावून घेतले.  रात्री दोघंही दारू पिले. यावेळी  नरसिंगने त्याला 1 हजार रुपये दिले. त्यानंतर दोघंही घरी जात असताना संगमवाडी येथे त्यांच्यात पुन्हा पैशावरून वाद झाला. व आणखी 1 हजार रूपयांची मागणी दुर्गेश जवऴ केली. हा किरकोळ वाद गंभीर हातापायी पर्यंत पोहोचला. व याच दरम्यान दुर्गेशने दगड उचलून त्याच्या नरसिंगच्या डोक्यात घातला. पोलीसांनी दुर्गेश गोस्वामी अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.