_MPC_DIR_MPU_III

Pune : महापालिका शाळेतील शिक्षकांना सुपर 30 हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा

विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका शाळेतील शिक्षकांना सुपर 30 चित्रपट मोफत दाखविण्यात यावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे ९५ टक्के विध्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात. त्याचे पालक हे अशिक्षित अथवा कमी शिकलेले असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकच मार्गदर्शक असतात. याविद्यार्थ्यांमध्ये अत्मविश्वास इच्छाशक्ती निर्माण करणे महत्वाचे आहे.  हा चित्रपट अय.अयटी स्पर्धां परीक्षेवर अधारीत आहे . गरीब मध्यमवर्गीय आणि श्रीमंत घरातील मुलांच्या वस्तुस्थितीवर अधारीत आहे . हा चित्रपट महापालिका शाळांतील शिक्षकांना दाखविल्यास त्यांना त्यांचे काम करताना उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे त्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.