IPL auction : आयपीएल लिलावात या संघाने अर्जुन तेंडुलकरला केले खरेदी

0

एमपीसी न्यूज : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला आयपीएलच्या यंदाच्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने आपल्या चमूमध्ये सहभागी केले आहे. अर्जुन तेंडुलकर याच्यावर पहिल्या फेरीत एकाही संघ मालकाने बोली लावली नव्हती. पण, लिलावाच्या अखेरच्या फेरीत मुंबईने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले. अर्जुन तेंडुलकरला २० लाख रुपयांना मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली चषकादरम्यान अर्जुन तेंडुलकर याने मुंबईच्या संघाकडूव पदार्पण केले होते. अर्जुन तेंडुलकर यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. अर्जुन तेंडुलकर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तर वेळप्रसंगी विस्फोटक फलंदाजी करु शकतो. अर्जुन तेंडूलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो.

नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अर्जुनने अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान मिळणार का? याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.