Pune News : पुण्याचे तापमान 9.9 अंश सेल्सियस

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

 एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यभरात थंडीचा कडाका कायम असून, शहरात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात बुधवारी 8.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर गुरवारी 9.9 अंश सेल्सियस तापमान आहे.

तर, राज्यात गोंदिया येथे नीचांकी म्हणजेच 8.00 तापमान नोंदवले गेले. पुढील आठवडाभर पुणे परिसरात तापमान 10अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.