Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने केजुबाई बंधा-यातील लाकडी ओंडके काढले बाहेर

एमपीसी न्यूज –  पवना नदीवर केजुबाई बंधा-यावरील मोरीत अडकलेली झाडाची मोठी खोडे, लाकडी ओंडके थेरगाव सोशल फाऊंडेशनने आज (शुक्रवारी) नदी बाहेर काढली. पवना नदीवरील केजुबाई बंधा-यातील सगळ्या मोरी सुरळीत वाहायला  लागल्या आहेत. नदीने मोकळा श्वास घेतला आहे.

थेरगाव सोशल फाऊंडेशन पवनामाईच्या स्वच्छतेसाठी कामकाज करतात. मागील काही दिवसांत पवना नदीवरील केजुबाई बंधा-यातील मोरीमधे पावसात वाहून आलेली झाडाची मोठी खोडे, लाकडी सांगाडे त्याला अडकली होती. जलपर्णीचे बेट तयार झाले होते. त्यातील प्रवाह अडकल्यामुळे गवत, कचरा कुजला होता.

टीएसएफने त्यातील काही सांगाडे, लाकडे बाहेर काढली होती. परंतु, काही मोठी लाकडे, झाडांची खोडे, सांगाडे काढता आले नव्हते. त्यासाठी यंत्रसामुग्री लागणार होती. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मोरीतील सर्व लाकडे व ओंडके बाहेर काढली. त्यामुळे पवना नदीवरील केजुबाई बंधा-यातील सर्व मोरी सुरळीत वाहायला लागल्या आहेत. त्यामुळे पवना नदीने मोकळा श्वास घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.