-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune District Crime News: गॅस कटरने एटीएम मशीन कट करून चोरट्यांचा बावीस लाखांवर डल्ला

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खाजगी बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कट करून त्यातील 21 लाख 74 हजार रुपये चोरून नेले. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चौफुला गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी रोहन चावडी पांडे (वय 37) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांनी विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्‍यातील चौफुला गावामध्ये आयडीबीआय बँकेचे हे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे चार ते सव्वा चारच्या दरम्यान चाकण बाजूने पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून आलेल्या चार चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला. त्यांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरा वर काळ्या रंगाचा स्प्रे मारला आणि गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कट करून आतील 21 लाख 74 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गेले. चोरटे शिक्रापूर च्या बाजूने निघून गेले आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शेलार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.