Wakad : बस प्रवासादरम्यान चोरट्यांनी दीड लाखांचा राणीहार पळवला

एमपीसी न्यूज – निगडी ते कात्रज या मार्गावर बसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार अज्ञात चोरट्यांनी पळवला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास दत्तनगर ते चांदणी चौक या दरम्यान घडली.

मंदा नवनाथ खवले (वय 35, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खवले शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पीएमपीएमएलच्या निगडी ते कात्रज या बसने प्रवास करीत होत्या. दत्तनगर ते चांदणी चौक हिंजवडी या दरम्यान त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेला सोन्याचा एक लाख 51 हजार रुपये किमतीचा राणीहार अज्ञात चोरट्याने बॅगची चेन उघडून चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.