Pune News : मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी बॉडी स्प्रे आणि शाम्पू बॉटल चोरून नेल्या

एमपीसी न्यूज : वाघोलीच्या जेजे नगर परिसरातील एका मेडिकल दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना 15 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी भरतकुमार रगाराम चौधरी (वय 24) यांनी फिर्याद दिली असून अजून लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे जेजेनगर मध्ये मेडिकलचे शॉप आहे. 15 जानेवारी रोजी दुकान बंद करून गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटर उचकटून आत प्रवेश केला. त्याने दुकानातील शाम्पूच्या बॉटल, बॉडी स्प्रे, रेड बुल आणि रोख रक्कम असा 25 हजार 164 किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

फिर्यादी दुसऱ्या दिवशी दुकानात आल्यानंतर पोलिस हा प्रकार उघडकीस आला. लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.