Wakad : पुनावळे येथे घरफोडी करून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – वर्षाविहारासाठी केरळ येथे गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी करून 4 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हाळ वस्ती, पुनावळे येथे उघडकीस आली.

अश्वराज अरुण ओव्हाळ (वय 30, रा. ओव्हाळ वस्ती, पुनावळे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओव्हाळ त्यांच्या कुटुंबासोबत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी केरळ येथे फिरायला गेले. केरळवरून धमाल करून रविवारी रात्री घरी परतले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कुलुपो तोडून घरात प्रवेश केला. घरातून 177 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.