Pune : लाचेची तक्रार दिल्याप्रकरणी वकिलास जीवे मारण्याची धमकी

दोघांविरूद्ध गुन्हा दाखल; मात्र एकास अटक;

एमपीसी न्यूज – तब्बल 1 कोटी 70 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तक्रार देणाऱ्या वकीलास बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 27 डिसेंबर ला घडला असून त्यांनी भीतीपोटी आरोपींविरुद्ध तक्रार देण्यास वेळ लावल्याचे समजत आहे. बुधवारी( दि 26)  अॅड. शेंडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंडगार्डन परिसरात 1 कोटी 70 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी अॅड. रोहित दत्तात्रय शेंडे (वय 27, रा. सहकारनगर स्वामी विवेकानंद सोसायटी,पुणे) याला पोलिसांनी अटक केली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अॅड. उमेश मोरे (रा.बालाजी नगर, धनकवडी) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दिली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडून अॅड. मोरे यांच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी 1 कोटी 70 लाखांची लाच मागितल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा करून लाच स्वीकारणाऱ्या अॅड. शेंडे यास बंडगार्डन परिसरात लाचलुचपच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लाचेची तक्रार दिल्यामुळे अॅड. उमेश मोरे यांना आडवून बंदूकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची दोघांनी धमकी दिली.

यापप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.