Hinjawadi : खेळणी चालकास बेदम मारहण

एमपीसी न्यूज – सातारा येथे पाळणा लावायचा आहे, असे सांगत बोलणी करण्यासाठी बोलावून घेऊन खेळणी चालक तरुणास चार अनोळखी व्यक्‍तींनी बेदम मारहाण केली. ही घटना म्हाळुंगे चांदेनांदे रोडवर शुक्रवारी (दि. 1) दुपारी घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुरेश प्रभू इंगोले (वय 28, रा. संविधान चौक, वानवडी, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, चार अनोळखी व्यक्‍तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फिर्यादी इंगोले यांना 7823828985 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. सातारा येथे पाळणा लावायचा आहे, असे सांगत त्यांनी बोलणी करण्यासाठी इंगोले यांना म्हाळुंगे चांदे-नांदे रोडवरील एका बांधकाम साईटजवळ बोलविले. यामुळे इंगोले हे त्यांचा मेहूणा विजय भोसले यांच्यासह बोलणी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गेले. त्यावेळी तिथे असलेल्या चार जणांनी काहीही कारण नसताना भोसले यांना खूर्ची फेकून मारली. यामुळे घाबरलेले भोसले तेथून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी इंगोले यांना लोखंडी गजाने मारहाण करीत गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.