Warje : वारजेतील वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज – वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. काकडे सिटी ते वारजे माळवाडी पर्यंतची वाहतूक समस्या गंभीर झाल्यामुळे वारजे विकास कृती समितीच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. पुणे महापालिकेने दखल घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. या भागातील डीपी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांनी दिली. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

या चौकात एकूण सात रस्ते एकत्र येतात. सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. याकडे वाहतूक विभाग आणि पुणे महापालिका विभाग लक्ष देत नसल्याने वारजे विकास कृती समितीच्या वतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण, नागरिकांना त्रास नको म्हणून रस्त्याच्या कडेलाच सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनात महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका दिपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाने, नगरसेवक सुशील मेंगडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी सरपंच श्रीकृष्ण बराटे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी सभापती रामभाऊ बराटे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल दुधाने, काँग्रेसचे युवा नेते सचिन बराटे, दत्ता झुंजे, अरुण दांगट, स्वीकृत नगरसेवक, सचिन दांगट, माजी नगरसेविका भाग्यश्री दांगट, उद्योजक माणिकशेठ दुधाने, अमोल बराटे, दत्तात्रय धुमाळ, वासुदेव भोसले, देवेन्द सूर्यवंशी, मयूर वांजळे, संजय वाल्हेकर व आयोजक के.डी.पवार, बाबा खान, गणेश गोकुळे व वारजे भागातील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आम्हाला वाहतूक कोंडी संदर्भात महापालिका व वाहतूक विभागाने ठोस उपाययोजनेचा आराखडा दाखविल्याने हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, असे जाहीर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.