Nigdi : रिक्षावर झाड उन्मळून पडले

एमपीसी न्यूज – वादळी पावसामुळे निगडी, ओटास्किम येथे रस्त्यावर उभा असलेल्या रिक्षावर झाड उन्मळून पडले आहे. सुदैवाने रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळीवा-यासह पिंपरी-चिंचवड शहरात पावसाला सुरुवात झाली. निगडी येथील ओटास्किम राजनगर येथे एका झाडाखाली रिक्षा थांबली होती. या वादळी वा-यामुळे झाडे उन्मळून रिक्षावर पडले. सुदैवाने यावेळी रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.  दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसात पिंपरी-चिंचवड शहरात झाड पडझडीच्या 50 ते 60 घटना घडल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.