Chakan : ट्रक चालकाने दोन लाखांचे लोखंडी मटेरियल केले लंंपास

एमपीसी न्यूज – जालना येथून चाकण (Chakan)  येथे लोखंडी मटेरियल आणत असताना एका ट्रक चालकाने ट्रक मधील दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे लोखंडी मटेरियल काढून त्याचा अपहार केला. हा प्रकार एक ते पाच जून या कालावधीत घडला.

Pune : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

वसीम रशीद शेख (वय 28, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक अंकित माताप्रसाद पटेल (वय 23, रा. बिरदवडी, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्टील मटेरियल सप्लायर्स आहेत. त्यांनी जालना येथून लोखंडी मटेरियल मागवले. आरोपीच्या ट्रकमध्ये जालना येथून सात टन 960 किलो वजनाचे लोखंडी बार भरण्यात आले. रस्त्यामध्ये आरोपीने तीन टन 400 किलो वजनाचे दोन लाख 10 हजार 800 रुपये किमतीचे लोखंडी बार काढून त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण (Chakan) पोलीस तपास करीत आहेत.

Pune : सेकंड ओपिनियन लघु चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.