Bhosari : ट्रक चालकाला धमकावून मोबाईल व रोकड पळवली

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला ट्रक पार्क करून ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला धमकावून चार जणांनी मिळून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री दहा वाजता एसटी परिवहन प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला भोसरी येथे घडली.

 

_MPC_DIR_MPU_II

हुवाप्पा रामचंद्र पुजारी (वय 39, रा. कळंबोली, पनवेल) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन ते चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी पुजारी हे ट्रक चालक आहेत. त्यांनी त्यांचा ट्रक एसटी परिवहन प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला भोसरी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केला आणि केबिनमध्ये झोपले. शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार अनोळखी चोरटे तिथे आले. त्यांनी ट्रकचा दरवाजा नॉक करून पुजारी यांना खाली उतरायला सांगितले. त्यानंतर पुजारी यांच्या खिशातील मोबाईल फोन आणि साडेचार हजारांची रोकड असा एकूण साडेसात हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.