Pune : आधी ट्रकने व नंतर अॅम्ब्युलन्सने दिलेल्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू

मृत्यू तर एक गंभीर जखमी.

एमपीसी न्यूज – आधी ट्रकने व नंतर अॅम्ब्युलन्सने दिलेल्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू होऊन एक गंभीर जखमी झाल्याची  घटना काल गुरूवारी (दि.18) रात्री पावणे अकराच्या सुमारास न-हे येथील मुंबई – बॅंगलोर हायवे रोडवर घटली.

या अपघातात आनंद प्रकाश व्यास( वय 34, रा. वारजे) याचा मृत्यू झाला असून रघुनाथ गोरख भोंडवे (वय 38, रा. भोरळे चौक, वारजे) हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक संतोष टकले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात ट्रक चालकाने वाहतुकीचे नियम न पाळता भरघाव वेगात ट्रक चालवून एका दूचाकीला धडक दिली. त्या धडकेत रघुनाथ व आनंद हे जखमी झाले. त्यानंतर ते दोघेजण उठत असतानाच पाठीमागून भरधाव वेगात येणा-या अॅम्ब्युलन्सने पुन्हा त्या दोघांना धडक दिली व
दोघांनाही गंभीर रित्या जखमी करून अॅम्ब्युलन्सचा चालक  अॅम्ब्युलन्स तेथेच सोडून तेथून पळून गेला. दरम्यान या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या आंनदला मात्र आपले प्राण गमवावे लागले.

याप्रकरणी पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.