Pune : तब्बल 50 लाख रुपये किमतीचे दुर्मिळ जातीचे खवले मांजर विक्रीसाठी आणलेल्या दोघांना अटक  

एमपीसी न्यूज – कात्रज येथून 50 लाख रुपये किमतीचे दुर्मिळ जातीचे खवले मांजर अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना युनिट एकच्या पोलिसांनी पकडून त्यांच्या ताब्यातील मांजरांना जप्त केले.

रामचंद्र दिनकर गायकवाड (वय २९ वर्ष, रा. मु.पो.खादेखोल, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), सुरज धनाजी फाळके (वय २० वर्ष, रा. मु.पो. सातारा रोड, ता. कोरेगाव, जि.सातारा), अशी आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

युनिट एकच्या पोलिसांना दोन इसम कात्रज येथे दुर्मिळ जातीचे खवले मांजर घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 10 किलो वजनाचे 3.5 फूट लांबीचे अंदाजे 50 लाख रुपये किमतीचे दुर्मिळ खवले मांजर आढळल्याने पोलिसांनी दोघांना अटक करून खवले मांजर त्यांच्या ताब्यातून जप्त केले.  भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.