Pune News : दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार

एमपीसी न्यूज : सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राहुल मच्छिंद्र कांबळे (वय.22,रा. माणिकबाग सिंहगडरोड) व कोथरुड पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार मंदार श्रीधर दारवटकर (वय.23,रा. सिंहगडरोड वडगांव ब्रु) या दोघांना  शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामिण परिक्षेत्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी दिले आहेत.

कांबळे हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुंड साथीदारासह अपहरण, खंडणी,बेकायदेशीर जमावामध्ये सामिल होणे, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दारवटकर हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.